
वेंगुर्ले : खासदार नारायण राणे साहेबांचा शब्द हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अंतिम शब्द असल्यामूळे आगामी काळात आमची सुद्धा महायुती व्हावी अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि वेंगुर्ले तालुक्यात महायुतीचेच काम करून नगरपरिषदे सहित जिल्हा परिषद व पंचायत समिती वर महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने पुढे काम करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप वेंगुर्ला तालुका चिटणीस तथा जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे विश्वासू कमलेश गावडे यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये युती करायची असे आमचे जवळपास ठरले आहे. युती व्हावी ही माझी इच्छा आहे. असे खासदार नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. यामुळे त्यांचा शब्द हा अंतिम मानून आम्ही काम करणार आहोत. आमची सुद्धा महायुती व्हावी अशी प्रबळ इच्छा असल्याचेही यावेळी कमलेश गावडे यांनी सांगितले.











