रानबांबुळी, ओरोस सरपंचांचा अतुल काळसेकरांनी केला सत्कार!

दोन्ही गावांचा विकास करण्यासाठी सहकार्य करू ; काळसेकरांची ग्वाही
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 21, 2022 19:27 PM
views 259  views

सिंधुदुर्गनगरी : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील निवडून आलेलेे रानबांबुळी गावचे सरपंच परशुराम परब तसेच ओरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई मुरमुरे यांचा सत्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाई सावंत, संतोष वालावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, रानबांबुळीचे माजी सरपंच संजय लाड, गजानन मुरमुरे, सुभाष परब आदी मान्यवर उपस्थित होते.

रानबांबुळी व ओरोस गावच्या विकासाबाबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी नवनिर्वाचित सरंपच यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली. या दोन्ही गावांचा विकास करण्यासाठी, गावातील असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासनही काळसेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित सरपंचांना दिले.