
वेंगुर्ले: उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी होडावडा येथील रमेश शांताराम दळवी (६५) याला भादवि ३०७ नुसार दोषी ठरवीत सात वर्षे सश्रम कारावासाची व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने जादा साधी कैद अशी शिक्षा येथील जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी ठोठावली. या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले.
याबाबतची हकीगत अशी फिर्यादी लक्ष्मण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रमेश दळवी याने फिर्यादी लक्ष्मण दळवी यांच्याकडून २० हजार रुपये उसने घेतले होते ते परत परत मागुनही त्याने परत देण्यास नकार दिला होता या रागातून २४ एप्रिल २०१६ रोजी लक्ष्मण याच्यावर होडावडा कोगुळ येथील नदीपात्रालगत चाकू हल्ला झाला होता लक्ष्मण हे मिरच्यांना पाणी देण्यासाठी गेले असता सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तुला ठार मारून टाकणार असे म्हणून चाकूने पाठीवर पोटावर डोक्यावर वार केले होते तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती त्यावरून आरोपी रमेश दळवी याच्यावर भादवी ३०७ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या कामे वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांनी तपास केला या खटल्यात एकूण फिर्यादी आणि तीन डॉक्टर्स दहा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आठ ठिकाणी फिर्यादीला दुखापत झाली होती हा मेडिकल रिपोर्ट या खटल्यात महत्त्वाचा ठरला या कामी साक्षीदार यांना हजर ठेवण्यासाठी पटला चालवण्यासाठी पोलीस निरीक्षक अतुल जाधव उपनिरीक्षक जय पाटील यांनी सहकार्य केले त्यानुसार भादवी ३०७ अन्वये सक्षम कारावासाची शिक्षा तोटावली तर ५०६ नुसार निर्दोष मुक्तता करण्यात आली.