कुडाळात २१ जानेवारीला श्री राम रथ यात्रा !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 20, 2024 12:10 PM
views 73  views

कुडाळ :राम भक्त कुडाळ व सिध्देश शिरसाट मित्रमंडळ आयोजित श्री राम रथ यात्रेचे कुडाळ येथे २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्री राम यांच्या मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

      श्री रामलल्लाच्या पवित्र मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होत आहे. समस्त हिंदूंसाठी आणि संपूर्ण भारतासाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे.या दिवशी प्रत्येक हिंदूनी स्वतःच्या घरी, सण उत्सव साजरा करायचा आहेच परंतु एवढ्या वरच न थांबता आपण सार्वजनिकरित्या सुध्दा हा दिवस साजरा करायला हवा याच उद्देशाने समस्त राम भक्त कुडाळ तसेच सिध्देश शिरसाट मित्रमंडळ यांच्या वतीने २१ जानेवारी रोजी कुडाळ शहरात भव्य राम रथ यात्रा फेरीचे आयोजन करण्याचे आले आहे.तरी सर्व राम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या फेरीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. २१ जानेवारी २०२४ साय. ४ वा.ही रथयात्रा काढण्यात येणार आहे . ही यात्रा कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथून सुरू होणार आहे. यानंतर गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, पानबाजार, राम मंदिर येथून गुलमोहर हॉटेल येथे या उत्सवाची सांगता होणार आहे.यानंतर कुडाळ शहरातील पहिले श्री राम मंदिर, गुलमोहर बस स्टॉप शेजारी येथे दि. २२ जानेवारी  रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ वा. अभिषेक, मंत्र पुष्पांजली, मंत्रपठण, रामरक्षा १०८ आवर्तने, रामपंचायत, महापुजा, नैवेद्य, आरती, दुपारी ३ वा. सुश्राव्य भजने, सायं. ७ वा. दिपोत्सव, सायं. ८ वा. यक्षिणी दशावतार मंडळ, माणगाव यांचा पौराणिक नाट्यप्रयोग रामदर्शन सादर करण्यात येणार आहे . या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सिध्देश शिरसाट, विवेक पंडीत, बंडया सावंत , राम नाईक, मिलिंद देसाई यांनी केले आहे.