इस्कॉन सावंतवाडी येथे रामनवमी उत्साहात

Edited by:
Published on: April 17, 2024 10:54 AM
views 310  views

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडीच्यावतीने सालाबादप्रमाणे आयोजित रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार,मंगळ, बुधवारी तीन दिवस रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमी दिवसी सकाळी १०वाजता भजन, कीर्तन, रामकथा ,१ वाजता आरती व महाप्रसाद देण्यात आला. भाविक कथा, किर्तनात दंग झाले. सावंतवाडीचे युवराज श्रीमान लखमराजे भोसले, राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब यांनी इस्कॉन सावंतवाडी सेंटर येथे भेट देऊन सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरे कृष्ण भक्तांनी प्रयत्न केले. पुण्याचे श्रीमान कृष्ण नाम प्रभुजी यांनी सांगितले ल्या कथेचा सर्वांनी लाभ घेतला. इस्काॅन सावंतवाडीच्या वतीने कृष्ण नाम प्रभुजी व आलेल्या भाविकांचे आभार मानले.