
वैभववाडी : सिंधुदुर्ग ड्रग्समुक्त अभियानांतर्गत वैभववाडीत पोलीसांच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती.शाळकरी विद्यार्थ्यांनी संदेश फलक हाती घेऊन या रॅलीत सहभाग घेतला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स मुक्त होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अभियान राबविण्यात येत आहे.त्या निमित्ताने आज वैभववाडीत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती.पोलीस ठाणे ते दत्तमंदिर अशी रॅली काढून शहरात जनजागृती केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, नगरसेविका अक्षता जैतापकर, कोकीसरे माधवराव पवार विद्यालयाचे विद्यार्थी व पोलीस सहभागी झाले होते.