
कणकवली : कणकवली नगरपंचायतीसाठी उपनगराध्यक्ष निवड आज मंगळवारी होत असून भाजपतर्फे नगरसेवक राकेश राणे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करतेवेळी भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांच्यासह भाजपचे सर्व ९ नगरसेवक उपस्थित होते.
१२ ते १ या वेळेत अर्ज छाननी होणार असून दुपारनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. दरम्यान राकेश राणे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आता कणकवली शहर विकास आघाडीतर्फे उपनगराध्यक्ष पदासाठी कोण अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.










