बुवा तारींच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 13, 2026 13:32 PM
views 50  views

 देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायतच्यावतीने स्वच्छता सभापती बुवा तारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग मार्फत देवगड शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये स्वच्छता करण्यात आली. यावेळी ग्रामस्थानमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

तसेच कचरा कुठे ही फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. देवगड - जामसंडे नगरपंचायत च्या वतीने स्वच्छता विभाग मार्फत यावेळी देवगड शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये स्वच्छता करण्यात आली देवगड किल्ला गणपति मंदिर परिसर साफ सफाई काम यशस्वीरीत्या पार पडले. “स्वच्छ शहर – स्वच्छ भारत” या संकल्पनेवर आधारित देवगड जामसंडे या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

समुद्रकिनारा स्वच्छता करून विघटनशीलकचरा, अविघटनशील आणि काच अशा प्रकारे वर्गीकृत करून घेण्यात आला.