
सावंतवाडी : आता ग्रा. पं. निवडणूकीचा प्रचाराचा अत्यंत शिगेला पोहचलाय. चराठे गावातही अत्यंत काटे की टक्कर पाहायला मिळतेय. सरपंच पदासाठी ५ महीला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने इथं प्रचारात जोरदार आघाडी घेतलीय. राष्ट्रवादीने इथं थेट सरपंचपदासाठी मारीता बावतीस फर्नांडिस यांना मैदानात उतरवलय. निवडणूक प्रभारी म्हणून राष्ट्रवादीने राकेश नेवगी यांच्यावर जबाबदारी सोपवलीय. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने इथं डोअर टू डोअर प्रचारावर भर देत धुरळा उडवलाय. सरपंचपदाच्या उमेदवार. सौ. फर्नांडिस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी पुरस्कृत 'श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनल'च्या प्रभाग क्र. १ चे उमेदवार सुनिल राजाराम परब, मंजिरी मिलींद उपरकर,प्रभाग क्र. ३ चे उमेदवार मिलींद अंकुश उपरकर, गौरी सागर गावडे यांच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील मारीता फर्नांडिस यांच्या प्रचारात सहभाग घेत त्यांच्यामागे ताकद उभी केली आहे. तर राकेश नेवगी यांनीही आपली संपूर्ण ताकद लावली आहे. घरोघरी जात गावाच्या सर्वांगीण विकासासाठीच मॉडेल ते मतदारपर्यंत पोहचवतायत. त्यांच्या या प्रयत्नांना गावचा वाढता पाठिंबा मिळत असल्याच चित्र आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारात महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतोय. राकेश नेवगी यांचा नियोजन बद्ध प्रचार आणि मतदारांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता इथल्या पंचरंगी लढतीतही 'श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनल'चा विजयाचा मार्ग सुकर ठरणार आहे.