युवराज सावंत यांना राजश्री शाहू प्रेरणा पुरस्कार

Edited by: संदीप देसाई
Published on: June 13, 2023 20:34 PM
views 94  views

दोडामार्ग : मांगेली प्रशालेचे शिक्षक युवराज सावंत यांना धम्म भवन चँरिटेबल ट्रस्ट कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा 'राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार' जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे  मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या 'राजर्षी शाहू प्रेरणा' पुरस्कारासाठी युवराज सावंत यांची निवड करण्यात आल्याचे पत्राद्वारे ट्रस्टने त्यांना कळवले आहे. युवराज सावंत हे दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय मांगेली येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली २५ वर्षे ते विविध क्षेत्रातील चळवळीत काम करतात. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील चळवळीतील क्रियाशील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अनेक संस्था संघटनांनी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सामाजिक बांधिलकी मानून व जनसेवेच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे.युवराज सावंत यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मित्र परिवारांकडून व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.