राजेंद्रकुमार जाधव यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 26, 2025 18:38 PM
views 53  views

कणकवली : खारेपाटण येथील मुळ रहिवाशी आणि सध्या वारगाव येथे स्थायिक झालेले समाजकल्याण विभाग ओरोस येथील सेवानिवृत्त वरिष्ठ सहायक राजेंद्रकुमार चंद्रकांत जाधव (58) यांचे नुकतेच गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. शिक्षिका म्हणून पावशी नं. 1 येथे कार्यरत असलेल्या सुजाता जाधव यांचे ते पती होत.