राजेंद्र कदम यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 10, 2025 16:36 PM
views 121  views

वैभववाडी : गडमठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम यांनी विद्यामंदिर गडमठ नंबर १ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

 श्री. कदम हे नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. दरवर्षी ते विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबवितात. यावर्षी सामाजिक जाणीवेचे भान ठेवून गडमठ येथील विद्यामंदिर १या शाळेत १ली ते७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यामध्ये चित्रकला वही, कलर,पेन्सिल खोडरबर, वह्यां यांचा समावेश होता. 

 याप्रसंगी बोलताना श्री कदम म्हणाले, आपण जे कमावतो त्यातील काही अंश समाजासाठी खर्च करणं गरजेचं आहे. याच भावनेतून मी हा उपक्रम राबविला. तसेच  सुरुवातीपासून मदत करणं मला खूप आवडते. प्रत्येकाने समाजासाठी अशी भावना ठेवणं आवश्यक आहे असे मत श्री कदम यांनी व्यक्त केले. यावेळी मिलन कदम, मुख्याध्यापक श्री हरकुळकर, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक श्री डोंगरे व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.