वंचित कडून राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी ...!

Edited by:
Published on: June 28, 2024 14:55 PM
views 37  views

कुडाळ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड .प्रकाश आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात ओंकार डीलक्स मंगल कार्यालय कुडाळ येथे पार पडली. यावेळी सुनील भोगटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश परुळेकर, प्रमुख  मार्गदर्शक वकील उत्तम कदम, काका कुडाळकर, नंदन वेंगुर्लेकर, सुदीप कांबळे उपस्थित होते.

आरक्षण हा गरिबी दूर करण्याचा कृती कार्यक्रम नसून दबलेल्या दलित ,पीडित आणि सामाजिक दृष्टीने पिचलेल्या लोकांना त्यांच्या उत्थानाचा मार्ग घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग आहे . मनुस्मृती च्या माध्यमातून हजारो वर्षे ज्यांनी आरक्षण मिळवले तोच समाज आज काही वर्षे आरक्षण मिळालं त्या समाजाच्या हिताच्या आड येत आहे असे मत ऍड कदम यांनी मांडले . मुळात 52 % ओबीसी ना 27 % आरक्षण आणि 16 % अनुसूचित जातीच्या लोकांना 13 % आरक्षण ही विषम वाटणी आहे . जर भाकऱ्या 100 असतील आणि खाणारे सुध्दा 100 रच असतील तर 52 लोकांना 27 भाकऱ्या आणि 16 लोकांना 13 भाकऱ्या अशी वाटणी ही चुकीची आहे याचा अर्थ 68 % लोकांना 40 % वाटा आणि 32 % लोकांना 60% वाटा हे धोरण अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारे आहे . त्यामुळे जीसकी जितनी संख्या भारी उसको उतनी भागीदारी हे सूत्र असले पाहिजे असे कदम म्हणाले .

आपण ओबीसी असल्यानें आपल्याला वेगवेगळ्या राजकिय पदाचा लाभ मिळाला .परंतु आता ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण संपवलं असून नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण मागच्या दाराने काढून घेण्याचे छडयंत्र मराठा आरक्षणाच्या माध्यमातून केलं जातं असल्याची शंखा काका कुडाळकर यांनी व्यक्त केली .

आपण मालवण विधानसभा मतदारसंघातील 15 जिल्हापरिषद गटातील सर्व गावामध्ये आरक्षित समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन बांधणी करणार आहोत .पुढील काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थां आरक्षित समाज्याच्या माध्यमातून ताब्यात घेतल्याशिवाय obc ,sc ,st आणि अल्पसंख्याक समाज्याच्या आरक्षणाचा लढा सुटणार नाही . मराठा समाज्याच्या कुणबी नोंदी चुकीच्या पद्धतीने सरकारी लोकांना हाताशी धरून घालण्यात आल्या असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरक्षित समाज्याच्या लोकप्रतिनिधी , नेते , विचारवंत आणि बुद्धिजीवी यांनी आता एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही . सर्व समाज बंधवांनी या लढाईत तन , मन ,धन देऊन सहकार्य करावे आणि या लढाईचे सैनिक व्हावे असे आवाहन श्री सुनील भोगटे यांनी केले .

जिल्हाध्यक्ष श्री महेश परूळेकर ,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वाय. जी. कदम ,प्राध्यापक वासंती तेंडोलकर यांनी या परिषदेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या 11 ठरावाचे वाचन केले आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या गडगडाटासह सर्व ठराव मंजूर केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महासचिव संजय पेंडुरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष बी.पी. कांबळे , कुडाळ तालुका अध्यक्ष निलेश वरदेकर , बाबा सोनावडेकर , आर .डी. कदम , सुधीर अनावकर , सत्यवान तेडोलकर , सत्यवान साठे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचलन श्री अमोल पावसकर यांनी केले.