असोंड रस्ता पावसात गेला वाहून

Edited by: मनोज पवार
Published on: August 17, 2025 21:18 PM
views 59  views

दापोली : दापोली तालुक्यातील वाकवली उन्हवरे रस्त्यावर असणारे असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी कालच्या अतिवृष्टीमुळे वाहून गेली.

दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे असोंड गावातील कुंभारवाडीकडे  जाणारा हा महत्वाचा रस्ता काल मध्यरात्री रस्त्याशेजारुन वाजणाऱ्या ओढ्याला भरपूर पाणी भरल्याने आणि हे पाणी बघता बघता मोरीवरून जाऊ लागल्याने ,पाण्याचा वेग प्रचंड असल्याने मोरीसह रस्ता वाहून गेला.

या घटनेमुळे गणेशवाडी तसेच अर्धी कुंभारवाडी यांचा गावाशी संपर्क तुटला तसेच नळपाणी योजनेकडे जाणारा हाच रस्ता असल्याने पाणी सोडण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. उपसरपंच दीपक देवरुखकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले " ह्या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण झाले आहे.त्याचवेळी ह्या मोरीच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने पुलाची मागणी केली होती पण अजूनपर्यंत त्यास मंजुरी मिळाली नाही त्यामुळे ही आपत्ती ओढवली आहे.