
सावंतवाडी : भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच्याकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधातील व्हिडिओ पत्रकार परिषदेत लावण्यात आले. यावेळी मंत्री केसरकरांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी 'हिट विकेट' होऊ नका या दिलेल्या संदेशाबद्दल विचारलं असता तेलींनी महायुतीच्या नेत्यांची माफी मागत, चुकीचं जनतेला समजलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत खेडेकर प्रकरण व शिक्षण खात्यातील घोटाळ्याचा व्हिडिओ सादर केला. यावेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिल. ठेकेदाराशी माझा संबंध असल्याचे पुरावे द्यावे राजकारण सोडतो नाहीतर तुम्ही सोडा असा इशारा दिला.दरम्यान, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठोकून काढा पण हिटविकेट होऊ नका असं महायुतीच्या नेत्यांना भाजपच्या अधिवेशनात सांगितलं होतं. याबाबत तेली-केसकर वादात सावंतवाडीत महायुती 'हिट विकेट' होतेय का ? असं विचारलं असता तेली म्हणाले, बिलकूल नाही. खोटेपणा बाहेर काढायलाच पाहिजे. नाहीतर जनता माफ करणार नाही. इथल्या लोकांच्या दोन हातांना काम मिळणं आवश्यक आहे. माझे नेते दीपक केसरकर नाहीत. माझे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, नारायण राणे, रविंद्र चव्हाण आहेत. त्यामुळे महायुतीबद्दल केसरकरांनी बोलू नये, माझे नेते मला बोलतील. महायुतीच्या नेत्यांची माफी मागतो. पण, हे चुकीचं चाललंय ते जनतेला समजलं पाहिजे. माझं केसरकरांशी वैयक्तिक वाकडं नाही. मात्र, या माणसाला एकडे बदला. तिकीट तुम्ही कुणालाही द्या असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी केल. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडीकर राहिले नसून चाकरमानी झालेत अशी खोचक टीका केली.










