
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली उद्या जिल्ह्यात येणार असून त्यांचे स्वागत सावंतवाडीत करण्यात येणार आहे. या दौऱ्याला शिवसेना आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली आहे.
उद्या सकाळी १०.३० वाजता राजन तेली यांचे बांदा खामदेव नाका येथे जंगी स्वागत होणार आहे. तदनंतर ११ वा. त्यांचे सावंतवाडी शहरात आगमन होणार असून येथेही त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. यानिमित्ताने श्री. तेली शिवसेनेचे नेते आणि आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयास भेट देणार आहेत.










