
सावंतवाडी : जनतेचा कौल मला मान्य आहे. फक्त एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की अखंड शिवसेना असताना दीपक केसरकरांना 70 हजार मते पडली होती. पण शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर आज त्यांना 80 हजार मते पडली. ही 80 हजार मते पडताना या मतदार संघातील आरोग्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न एवढे गंभीर प्रश्न असताना सुदधा एवढी मते कशी पडली ? याचेच आश्चर्य वाटते असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, मी 2014 साली निवडणूक लढवली त्यावेळी मला जवळपास 30 हजार मते पडली होती व आज पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत तसेच केसरकारांच्या विरोधात वातावरण असताना एवढी मत पडणे म्हणजेच सध्याचे राजकारण हे सच्चा कार्यकर्त्याचे काम नाही. हे काय चाललय तेच समजत नाही. मी प्रामाणिकपणे काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व जनतेचे मनापासून आभार मानतो अशा भावना राजन तेली यांनी व्यक्त केल्या.