
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत केलेल्या घोषाणांमधील प्रकल्पांत १० जाणांना तरी नोकऱ्या लावल्या असतील तर त्यांनी जाहीर करावं, मी त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून काम करेन अस खुल आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी दिलं. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी केसरकरांनी केलेल्या घोषणा दाखवून तेली यांनी त्यांच्यावर तोफ डागली. भाजपचा या ठिकाणी दावा असून केसरकर सोडून कुणालाही उमेदवारी द्या असंही श्री. तेली म्हणाले. मी केसरकरांच काम करणार नाही हे निश्चित आहे. महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यावर मी चर्चांबाबत बोलेन तोवर मी कोणत्याही प्रकारच भाष्य करणार नाही. भाजपच्या सरपंचावर एखादा मित्रपक्षाचा नेता दबाव टाकून अविश्वासाचा ठरावाची नोटीस पाठवत असेल तर आम्ही यांचं काम कस करायच ? असा सावल देखील राजन तेली यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच केसरकर यांनी माझ राजकीय पुनर्वसन करण्याची गरज नाही. माझे वरिष्ठ नेते माझ्याबद्दल विचार करतील. तुम्ही तुमच्या पार्टीचा व तुमच्या कार्यकर्त्यांचा विचार करा, आगामी निवडणुकीनंतर तुमचं पुनर्वसन करावे लागलेले असा पलटवार श्री. तेली यांनी हाणला.