
सावंतवाडी : शिक्षणमंत्री म्हणून मी राज्यात चमकदार कामगिरी केली. मतदार संघात सुध्दा मी कोट्यावधीचा निधी आणला. मंत्री म्हणून काम करताना कोणाच्या जमिनी खरेदी केल्या नाहीत. कोणाला त्रास दिला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे अस विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात मला स्टार प्रचारक म्हणून विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी निमंत्रण आहे. माझ्या मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीने माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली तर मला राज्यात प्रचाराला जायला सोपं जाईल अस मत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक मी "धनुष्यबाण" चिन्हावरच लढणार असेही स्पष्ट केले. माझ्या मतदारसंघात अनेक काम केली आहेत. माझ्यावर टीका करणारे त्याच विकासकामांवर जाऊन माझी बदनामी करत आहेत. त्यांना देवाने सुबुद्धी देवो अशी मी प्रार्थना करेन. भाजपशी माझे स्नेहसंबंध आहेत. राज्यात महायुती आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे आहेत. राजन तेलींनी माझा प्रचार करायचे की नाही ते भाजपचे वरिष्ठ ठरवतील. मागच्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कणकवलीला पक्षाचा उमेदवार दिल्यामुळे भाजपने सावंतवाडीत राजन तेली यांना उभे केले होते. राजन तेलींचा यावेळी पराभव झाला ते त्यांना दुःख असेल पक्षाचा सपोर्ट नसेल तर माणूस काय करू शकत नाही. त्यामुळे तेली यांना मान्य असेल तर त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेईन असेही श्री. केसरकर म्हणाले.