
सावंतवाडी : माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा परिषद सीओ प्रजित नायर तसेच जिल्हा परिषद अतिरिक्त सीओ विशाल तनपुरे यांची भेट घेऊन सरपंचांच्या काम करत असतानाच्या येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच संघटना अध्यक्ष दिपक नाईक,हेमंत मराठे, हनुमंत पेडणेकर, सत्यविजय गावडे, संतोष राऊळ, जावेद खतीब, दिनेश सारंग, लवू भिंगारे, संदीप नेमळेकर आदी सरपंच उपस्थित होते.