राजन तेली युतीचा धर्म विसरले : राजन पोकळे

Edited by: विनायक गावस
Published on: February 15, 2024 09:24 AM
views 201  views

सावंतवाडी : दीपक केसरकरांना जागा दाखविण्याची भाषा करणारे माजी आमदार राजन तेली युतीचा धर्म विसरले आहेत. त्यामुळे तेली असेच बोलत राहिले अन् भुमिपूजन करत सुटले तर नक्कीच 'हॅट्रीक' करतील असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी लगावला. 

दरम्यान, शहरातील नळपाणी योजना आणि माजगाव धरणाच्या कामाचे भुमिपुजन करणार्‍या राजन तेली यांनी चांगलेच केले. त्यांच्याबाबत न बोललेच बर, असाही चिमटा त्यांनी यावेळी काढला. ते म्हणाले, राजन तेली हे केसरकर यांच्यावर बोलत आहे हे चांगले आहे. ते असेल बोलत राहिले तर नक्कीच हॅट्रीक करतील असा टोला त्यांनी लगावला. तेली युतीचा धर्म विसरले आहेत. त्यामुळे नियोजित कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत असताना त्यांनी आदीच जात भूमिपुजन केली. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. त्यांच्या बद्दल काय बोलणार? असा उलट सवाल राजन पोकळे, अशोक दळवी यांनी केला.