
सावंतवाडी : लढाईसाठी सैनिकांनी तयार असल पाहिजे ही नारायण राणेंची शिकवण आहे. त्यामुळे आम्हीही तयारीत आहोत. जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल. निलेश राणेंची भुमिका स्वागतार्ह आहे. उद्या जिल्हा बँकेचीही सत्ता शिवसेना स्वबळावर आणू शकते असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील मेळाव्यात ते बोलत होते. तेली म्हणाले, मला आजही कोणतीही नोटिस आलेली नाही. नोटीसीला घाबरून पळणारा मी नाही. माझी लढाई चालूच राहील. आताची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. वेगळं लढण्याची इच्छा नव्हती. युती म्हणून आमची भूमिका असताना समोरून स्वबळाचा नारा दिला जातोय. ऐनवेळी युती न झाल्यास करायचं काय ? आपण तयार असल पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल.आमचं कोणाशी भांडण नाही. शिवसेना वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.










