सावंतवाडीतील 30 हून अधिक युवकांचा मविआत प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2024 16:27 PM
views 196  views

सावंतवाडी : शहरातील तीसहून अधिक युवकांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत निशांत तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. 

संदीप वेंगुर्लेकर, इकबाल शेख, स्वप्निल बागकर, गौतम सूर्यवंशी, अनिकेत मोरये, अमोल सारंग, बाळा पेडणेकर, नारायण गावकर, राहुल भालेराव, प्रसाद सारंग, प्रशांत जोशी, अल्विन पिंटू, बबलू तळवणेकर, अन्वर शेख यांच्यासह तीस हून अधिक जणांनी उबाठा शिवसेनेत पक्षप्रवेश केला.