राजापुरात राजन साळवींचा करिष्मा

10 पैकी 8 ग्रा. पं. वर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं वर्चस्व
Edited by: संदीप देसाई
Published on: October 17, 2022 12:21 PM
views 1625  views

राजापूर : राजापूर तालुक्यातील झालेल्या १० ग्रामपंचायत निवडणूकित ८ ग्रामपंचायत वर वर्चस्व मिळवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने भगवा फडकविला आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी हा करिष्मा करत कोकणात अजूनही शिवसेना ताकद तीच असल्याचे दाखवून दिले आहे, विजयानंतर कोकणसाद पहिली प्रतिक्रिया देताना मूळ शिवसेना व आमदार राजन साळवी यांची कोकणात असलेली ताकद अधोरेखित झाली असून मरेपर्यंत राजन साळवी शिवसेनेचाच असेल असे ठणकावून सांगा.

तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उप जिल्हा महिला संघटक दुर्वा तावडे यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.