राजन तेली यांनी फुक्याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : राजन पोकळे

Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2024 19:53 PM
views 200  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामे ही शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच झाली आहेत. त्यामुळे उगाच स्वतःच्या वेगळ्या हेतूसाठी आपणच ही कामे केल्याचे सर्वसामान्य जनतेला भासू नये, सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांडे आमदारांच्या शिफारसीनुसार काम होतात हे ज्ञात आहे असा पटलावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केला. तर मुंबई, कोल्हापूरची काम पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल असं म्हणावं का असाही सवाल करत स्थानिक आमदारांच्या शिफारसीनुसारच ही काम होतात. या प्रक्रियेबद्दल माजी आमदार राजन तेलींना कल्पना नाही असं मला वाटतं नाही असं पोकळे म्हणाले.


दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारसीनुसारच पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही कामे मंजूर करतात. त्यामुळे राजन तेली यांनी फुक्याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोला देखील राजन पोकळे  यांनी लगावला.