राजन, परत असं करू नकोस | राणेंनी तेलींची काढली समजूत

Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2024 13:06 PM
views 1164  views

सावंतवाडी : राजन, परत असं करू नकोस. आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे एक दिलानं काम करा अशी समज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांना दिली. राजन तेली यांच्या नाराजीच्या 'हट्टापायी' स्टेटस बाबत आज मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी नारायण राणे यांनी चांगल्या कार्यात अपशकुन नको. आपण पक्षहीत जपतो अशा कानपिचक्या देत आपण तेलींशी प्रत्यक्ष बोलेन असे सांगितले होते. त्यानंतर माजगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राजन तेली यांची समजूत काढून आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे असे सांगितले. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.