ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी रज्जब रमदूल !

खा.विनायक राऊत यांनी केलं अभिनंदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 06, 2024 11:16 AM
views 324  views

वैभववाडी : ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख पदी उंबर्डेचे काशीम (रज्जब) रमदूल यांची निवड झाली. खासदार विनायक राऊत  व शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. 

     काही महिन्यांपूर्वी भाजपातून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेल्या रज्जब रमदूल यांच्यावर अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख पदाची पक्षाने जबाबदारी दिली आहे.

कणकवली येथे खासदार  विनायक राऊत यांच्या हस्ते श्री.रमदुल यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.खा.राऊत यांनी श्री. रमदूल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक,उपनेते अरुणभाई दुधवडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांसह  महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा प्रमुख, इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते