राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

संतोष मयेकर यांचं उपस्थित राहण्याचं आवाहन
Edited by:
Published on: May 04, 2024 07:30 AM
views 236  views

देवगड : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांतील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या निवडणुक प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा आज  दि. ४ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता, उपजिल्हा रुग्णालय व रेल्वे स्थानक जवळ कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे प्रमुख वक्ते - राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना असणार आहेत या सभेसाठी बहुसंख्येने कोकणवासियांनी उपस्थित रहावे.असे आवाहन संतोष मयेकर मनसे तालुका अध्यक्ष देवगड यांच्याकडून करण्यात आले आहे.