मारहाणीची धमकी देऊन उठवला बाजार !

दीपक केसरकर भाजपच्या नेत्यांना पुरून उरले ; 'हॉकर्स'च वक्तव्य
Edited by: विनायक गावस
Published on: May 23, 2023 19:36 PM
views 92  views

सावंतवाडी : आठवडा बाजाराची जागा हॉकर्स संघटनेनं कुणाच्या दबावाखाली स्वीकारलेली नाही‌. दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच माजी नगराध्यक्ष संजू परब आणि  पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखिल निवेदन देत हा बाजार याच ठिकाणी रहावा अशी मागणी केली होती. पण, केसरकर भाजपच्या नेत्यांना पुरून उरले  असं नाईलाजाने म्हणावे लागेल असं मत हॉकर्स संघटनेनं व्यक्त केल. तर हॉकर्स ही कॉ. गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. त्यामुळे मॅंनेज होण्याची परंपरा आमची नाही. ती कुणाची आहे हे जनतेला ठावूक आहे. मॅंनेज झाल्याचे आरोप करणारे स्वतः मॅनेज होत असतील‌ असा पलटवार अँड. संदीप निंबाळकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना लगावला. 


अँड. निंबाळकर म्हणाले,आठवडा बाजाराची जागा हॉकर्स संघटनेनं कुणाच्या दबावाखाली स्वीकारलेली नाही‌. हा बाजार मोती तलाव काठीच असावा ही मागणी आम्ही लावून धरलेली होती. दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच माजी नगराध्यक्ष संजू परब आणि  पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखिल निवेदन देत हा बाजार याच ठिकाणी रहावा असं निवेदन दिल होत. अन्य पर्यायी जागा आम्ही सुचवल्या पण प्रशासन ते मान्य करत नाही. होळीच्या खुंटापेक्षा गोदामाकडील जागा सोयीस्कर असल्यानं नाईलाजानं त्याचा स्वीकार करावा लागला. संजू परब यांच्या काही मतांशी आम्ही सहमत आहोत. दीपक केसरकर यांनी आपलं पूर्ण वजन हा आठवडा बाजार हलविण्यासाठी वारपला पण, हॉकर्स संघटनेवर आरोप करणाऱ्या संजू परब यांनी हा बाजार हलवू नये यासाठी काय प्रयत्न केले हे जाहीर केले नाही. आम्ही सर्वांना निवेदन दिली‌. दोन हजार सह्यांच पत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना आठवडा बाजार हलवू नये म्हणून दिलं. पालकमंत्र्यांनी याची दखल घेत बाजार हलवू देता नये होता. आजही कुणी बाजार तलावाकाठी भरवत असेल तर आम्ही त्याच स्वागत करू, आम्ही कुणालाही मॅनेज झालेलो नाही. मॅंनेज होण हे आमच्या कार्यपद्धतीत बसत नाही. हॉकर्स ही कॉ. गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. मॅंनेज होण्याची परंपरा आमची नाही. ती कुणाची आहे हे जनतेला ठावूक आहे. मॅंनेज झाल्याचे आरोप करणारे स्वतः मॅनेज होत असतील‌. त्यामुळे असले फाल्तू व खोटे आरोप करत आहेत. आम्ही ग्राहक व विक्रेते यांच्या हिताची भुमिका घेत आहोत. तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका, हॉकर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते होऊ देणार नाही. फेरीवाल्यांच हित आम्हाला महत्त्वाचे आहे. होळीच्या खुंटापेक्षा ही जागा गैरसोयीची असताना नाईलाजाने स्वीकारली आहे. केसरकर हटवादी पणा करत असतील तर मित्रपक्ष म्हणून भाजपने व्हेटो वापरायला हवा होता. ते न करता लांच्छनास्पद आरोप करण योग्य नाही असं मत अँड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केल.


दरम्यान, संजू परब यांनी आपली ताकद वापरली नाही. तर दीपक केसरकर यांनी सुचवलेली जागा आम्ही घेतली नाही. त्यांनी सुचविलेल्या जागा नाकारत होळीच्या खुंटापेक्षा आम्हाला सोयीस्कर व सावलीची जागा म्हणून फेरीवाल्यांच्या संमतीनं ही स्वीकारली. कुणाच्या दबावाखाली आम्ही नाही. माजी नगराध्यक्ष संजू परब यांना काही करावसं वाटतं असेल तर आजही त्यांनी ते करावं. मागचा बाजार हलवताना नियमांच्या आधारे बाजार न हलविल्यानं दीपक केसरकर यांची मोती तलाव काठावरचा बाजार उठवायची हिंमत झाली. आता सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. तो आदेश न झाल्यास पुढील बाजार इथे बसू देणार नाही. मंत्री म्हणून केसरकर भुमिका घेत असल्याचं पत्र आल्यानं त्यावर दबाव रहावा यासाठी पालकमंत्री व पालकमंत्र्यांना ऐकत नसतील तर केंद्रीय मंत्र्यांनी दखल घ्यावी यासाठी रविंद्र चव्हाण व नारायण राणे यांना निवेदन दिली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना हे लक्षात घ्यावं. दीपक केसरकर भाजपच्या नेत्यांना पुरून उरले  असं नाईलाजाने म्हणावे लागत आहे मत महेश परूळेकर यांनी व्यक्त केले. तर  आम्हाला कॉन्सिलचा ठराव झाला नाही अशी माहिती प्रशासनानं दिली. संजू परब म्हणत आहेत ठराव झाला. ठराव झाला असेल तर पुढच्या मंगळवारी आम्ही तलावाकाठीच बसणार, तलाव काठ सोडण्यासाठी आम्हाला पोलिस कुमक बोलवून मारहाण करण्याची धमकी प्रशासनानं दिल्याची माहिती अजय जाधव यांनी दिली.

 

दरम्यान, तलाव काठावरची जागा योग्य आहे ही हॉकर्स संघटनेची भुमिका आहे. पण, दीपक केसरकर बाजार हलविण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव आणत आहेत हे दिसून येत आहे. गोदामाकडील जागा न स्वीकारल्यास होळीच्या खुंटावर बाजार भरवणार असं सांगितलं होतं. त्यामुळे ही जागा नाईलाजाने स्वीकारली, आजही तलाव काठच योग्य होता ही आमची भूमिका आहे असं मत संघटनेनं व्यक्त केल. यावेळी हॉकर्स संघटनेचे अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, अजय जाधव आदी उपस्थित होते.