
देवगड : मंत्री ना.नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवसानिमित्त संपूर्ण विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिठबावं जिल्हा परिषद विभागात भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या सहकार्याने आणि मिठबावं जिल्हा परिषद गट यांच्यावतीने वायरमन यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, प्रकाश राणे, सावी लोके, भाई नरे, शैलेश लोके, सुनील पारकर, बांबूळकर सर, निशांत परुळेकर, महेश राणे, प्रवीण राणे, गणपत लोके, पुरुषोत्तम तेली मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि वायरमन कर्मचारी उपस्थित होते.