
कुडाळ : कुडाळमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये कुडाळ, मालवण, कणकवली आणि सावंतवाडी या भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत रस्त्यांवर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पावसाचे प्रमाण वाढल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.