दोडामार्ग : गेल्या २४ तासात तिलारीत तब्बल २२१ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाची संतातधार अद्याप कायम आहे. त्यामुळे अत्यावश्यक तरच घराबाहेर पडा असे आवाहन तिलारी कडून करण्यात आलंय. पावसाची तीव्रता जास्त असल्याने कुठेही नाल्याला अचानक मोठा प्रवाह येऊ शकतो. यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन तिलारीचे कार्यकारि अभियंता विनायक जाधव यांनी केलं आहे. तिलारीतुन सुरु सलेल्या विसर्गात सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. तिलारी नदी ईशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.