पावसाने झोडपलं ; दगड रस्त्यावर ; घरं कोसळली

Edited by: मनोज पवार
Published on: July 13, 2024 07:21 AM
views 341  views

मंडणगड  :  हवामान खात्याने इशारा दिलेल्या कालवधीत तालुक्यात शांत असलेल्या पावसाने शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात तालुक्यात चांगलाच जोर पकडला आहे. 13 जुलै 2024 रोजी तालुक्यात सरासरी 113.75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात मंडणगड महसुल मंडळात 150 मिलीमीटर, म्हाप्रळ महसुल मंडळात 102 मिलीमीटर, देव्हारे महसुल मंडळात 140 मिलीमीटर, वेसवी महसुल मंडळात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी 8.00 च्या सुमारास केळशी येथून मंडणगडकडे मार्गस्थ झालेल्या  केळशी मंडणगड गाडीस कोन्हवली येथे एका अपघाती वळणावर गाडी रस्त्यावरुन खाली उतरल्याने अपघात झाला. यावेळी या गाडीत चालक व वाहकासह एकूण 35 प्रवासी प्रवास करीत होते. यातील बहुतांश प्रवाशी विद्यार्थी होते, सुदैवाने या अपघातात कोणासही गंभीर दुःखापत झाली नाही. घटनेची माहीती कळताच तहसिल कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थान कक्षातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व रुग्णवाहीकेस तातडीने अपघाताचे स्थळी गाठले व मदत कार्यास सुरुवात करुन गाडी रस्त्यावर आणली. 

मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोंझर अडखळ व गांधी चौकातील प्रभागांकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी 12 जुलै 2024 रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास डोंगराकडील धोकादायक बाजूने भला मोठा दगड रस्त्यावर कोसळुन रस्त्यावर आला यामुळे रस्त्यावरी वाहतूक बंद होण्याची वेळ आली आहे तहसिलदार श्रीधर गालीपील्ले यांनी तातडीने आपली आपत्ती व्यवस्थान टिम मंडळ अधिकारी तलाठी यांच्याबरोबर मंडणगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी हजर राहण्याचे आदेश दिले यावेळी येथील सर्व नगरसेवक व नागरीकही घटनास्थळी उपस्थित होते जेसीबी मदतीने सुमारे तासाभरात हा दगड रस्त्याचे बाजूला करुन वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. 


म्हाप्रळ बंदरवाडी येथे पावसामुळे घरांचे अंशतः तर मंडणगड येथे कंपावूंड वॉल कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. महसुल विभागाचे कर्मचारी नुकसानीचे पंचन्यामासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  


अडखळ पुलावरुनही पाणी- दोन दिवस सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे निवळी नदीचे पाण्याची पातळी वाढल्याने कोंझर व अडखळ या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी गेल्याने अडखळ टाकवली या गावाची वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.


गावागावात विज पुरवठा खंडीत- दोन दिवसाचे पावसाने मंडणगड शहरासह पाले गावातील विज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाल्याची माहीती मिळाली आहे. पाले गावाचे वायरमन सुरज माळी यांनी आपल्या सहकार्यांसमवेत भर पावसात दुरुस्तीचे काम करुन विज पुरवठा पुर्ववत केला.