देवगडमध्ये मुसळधार पाऊस | अनेकांचे नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 27, 2024 14:40 PM
views 70  views

देवगड : देवगड येथे आज गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात ठिक पडझड होऊन नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे छोटी मोठी झाडे ही उन्मळून पडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. या आपदग्रस्‍तांमध्ये माधुरी महेंद्र मांजरेकर वाडा मूळबांध, (देवगड) घराची पडवी कोसळून नुकसान झाले असून रू १५०००/- चे नुकसान झाले आहे.तसेच कल्याण दत्तात्रय जाधव वाडा मूळबांध, यांच्या घराची सरंक्षक भिंत कोसळून अंशत रक्‍कमः-रू १६०००/- चे नुकसान झाले. विजय विठोबा अनमने मणचे देवूळवाडी,- राहते घरावर डोंगरातील दगड कोसळून अंशत रक्‍कमः- रू ७१४४०/- नुकसान झाले सदरचे व्‍यक्‍तींना बाजूच्‍या घरात स्‍थलां‍तरित करण्यात आले ..दत्‍तात्रय कुलकर्णी हिंदळे, – घराच्‍या पडवीवर सुपारीची ५ झाडे पडून नुकस- अंशत रक्‍कमः-रू ७०००/- नुकसान झाले असून महसूल विभागाने नुकसानीची पंचयादी केली आहे.