
मालवण : सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातलंय. यात मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्यात. मालवण तालुक्यातील गोठ्याचं या पावसात छप्पर उडून गेल्याची घटना घडलीय.
बुधवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकणी पडझड झालीय. देवेंद्र खोत यांच्या गोठ्याचं छप्पर उडालाय. मालवण तालुक्यातील रामगड गावात ही घटना घडलीय. यामुळे देवेंद्र खोत यांचं जवळपास 20 हजारांचं नुकसान झालंय.