
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्हातील सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल रात्री दहा वाजता विजेच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. विजेच्या प्रचंड गडगडासह काही भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे.
सावंतवाडी शहरात पावसाने गडगडाटासह अचानक हजेरी लावली होती.तर सावंतवाडी शहराच्या नजीकच असलेल्या कोलगाव, मळगाव, मळेवाड; कुणकेरी,आकेरी, माडखोल,कुडाळ तालुक्यातील माणगाव, वाडोस, गोठोस,शिवापूर आधी भागात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने दिवाळीच्या बाजारपेठांवर याचा परिणाम पाहायला मिळाणार आहे. हा परतीचा पाऊस असल्याचे मानले जात आहे. अचानक पाऊस आल्याने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली होती. रात्रीपासून विजेसह इंटरनेट सुविधा बंद होती. सध्या तुरळक प्रमाणात पाऊस सुरू आहे.