
वैभववाडी:ऐन तुळशी विवाहादिवशीच मांगवली पंचक्रोशीत मुसळधार पावसाने झोडपून काढले. विवाहाची केलेली तयारी पाण्यात गेली आहे. पावसाचा जोर कायम आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सा-यांचा हिरमोड झाला .
गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता. थंडी सुरू झाली होती. मात्र. आज अचानक पुन्हा वातावरणात उष्णता वाढली. त्यानंतर सायंकाळी मांगवली पंक्रोशीत पावसाने हजेरी लावली. मांगवली, हेत,उपळे,वेंगसर ,उंबर्डे, भुईबावडा या भागात जोरदार पाऊस झाला. तुळशी विवाहा दिवशी पडलेल्या पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला. मातीच्या तुळशी पावसामुळे वाहून गेल्या. तसेच विवाहाच्या तयारीवरही पावसाने पाणी फिरवले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भात भिजले आहे. तसेच वैरणही भिजून गेले.