
मंडणगड : जुलै महिन्यात संततधार सुरु असलेल्या पावसाने तालुक्यात घरे व गोठे नुकसान झाल्याची माहिती तहसिल कार्यालयाकडून मिळाली आहे. 22 व 23 जुलै 2024 लातहसिल कार्यालयाने केलेल्या पंचनाम्यातील माहीतीनुसार 22 जुलै 2024 रोजी मंडणगड तालुक्यातील मौजे पाले इथं पावसाने झालेल्या पडझडीत वनिता विजय बटावले यांचे घराचे अतिवृष्टी मुळे अंशतः नुकसान रक्कम ११९९५/- इतके नुकसान झाले आहे.
भिकु सोनु माळी यांचे घराचे अंशतः नुकसान रक्कम ११७९५ इतके नुकसान झाले आहे. लीला शंकर माळी यांचे घराचे अंशतः नुकसान रक्कम १४१९० इतके नुकसान झाले आहे. मौजे तुळशी येथील देवराज मनोहर जाधव यांचे गोठ्याचे अंशतः नुकसान १४९४० इतके नुकसान झाले आहे. वरील चारही आपदग्रस्तांचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. 23 जुलै 2024 रोजी तालुक्यातील मौजे पालवणी येथील अशोक सखाराम दिवेकर यांचे घरावर झाड पडून अंशत : अंदाजे 17,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. पालवणी येथे पंचनामा करण्यात येत आहे. मौजे गवळवाडी येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बांधलेली सिमेंट टाकी (तळी) ची संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे अंदाजे नुकसान रुपये 2,00,000 झाले आहे.
दोन दिवसात कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. मंडणगड पालवणी रस्त्यावर निगवणी वाडिजवळ झाड पडले असून काही काळाकरिता वाहतूक बंद झाली होती सार्वजनीक बांधकाम विभागने तातडीने जागेवर झावून मशिनचे मदतीने सायंकाळी उशीरा झाड हटवून वाहतूक पुर्ववत केली.