
सिंधुदुर्गनगरी : शनिवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने ग्रामीण भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी तेथील वाहतूक ठप्प झाली होती.ठिकठिकाणी शेती पाण्याखाली गेली होती. दुपार नंतर पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू होती.
शनिवारी मध्यरात्री पासून ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू होता. या पावसाने जिल्ह्यातील सर्वच महत्वच्या नद्या पूर्णक्षमतेने पाहत होत्या. परिणामी अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. गावातील अनेक ब्रीज वर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कुंदे पूलावर पाणी आल्याने कसा ल, आंबड पोखरण कळसुली मार्गावरील वाहतूक बंद होती. घोडा वडे पुलावर पाणी आला रे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मठ मार्गे वळविण्यात आली होती. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोठणे किर्लोस बंधाऱ्यावर गड नदीचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बद होता परंतु किर्लोस ला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होता.
आजच्या पावसाचा फटका ग्रामीण भागाला सर्वात जास्त बसला आहे. पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली होती. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शेती बराच वेळ पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. दरम्यान पुढील ७२ तास पावसाचे असून या कालावधीतील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेला पाऊस..!
देवगड - ८९.४ मिमी, मालवण ८८.४ मिमी, सावंतवाडी १११.८, मिमी, वेंगुर्ला ९८ मिमी, कणकवली ९८.५ मिमी, कुडाळ ८८ मिमी, वैभववाडी ९६.४ मिमी, दोडामार्ग ८७.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.