गणेशोत्सव कालावधीत रेल्वे गाड्यांमधील डबे वाढवणार

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय
Edited by: प्रतिनिधी
Published on: August 23, 2022 21:56 PM
views 184  views

रत्नागिरी : अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणशोत्सावासाठी कोकण रेल्वे महामंडळाने खास चाकरमान्यांच्या सोयीकरता आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मार्गावरील काही गाड्यांमध्ये २ एसी टू टीयर कोच, २ एसी थ्री टीयर कोच आणि १ एसी चेअर कार कोच तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२ एसी - टू टीयर कोच, २ एसी - थ्री टीयर कोच आणि १ एसी - चेअर कार कोच ट्रेन क्र. ११०९९ /१११०० लोकमान्य टिळक (टी) - मडगाव जंक्शनमधील १२ एलएचबी कोचच्या विद्यमान रचनेत वाढवले आहेत. लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. ११०८५ / ११०८६ लोकमान्य टिळक (टी) - मडगाव जं. - लोकमान्य टिळक (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस. पुढील दिवशी १७ एलएचबी कोचच्या सुधारित रचनेसह ट्रेन धावतील.

गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. साप्ताहिक एक्सप्रेस दर शनिवारी २७/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ पर्यंत धावणार.

गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. - लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक एक्सप्रेस २७/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ पर्यंत दर रविवारी.

गाडी क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 2२७/०८/२०२२ ते ०७/०९/२०२२ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी धावणार.

गाडी क्रमांक ११०८६ मडगाव जं. - लोकमान्य टिळक (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार आणि गुरुवारी ३०/०८/२०२२ ते ०८/०९/२०२२ पर्यंत धावणार.

वरील गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.