सागर तळवडेकर यांनी वेधलं रेल्वे प्रशासनाचं लक्ष !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 10:50 AM
views 180  views

सावंतवाडी : अयोध्यानगरीत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी नवीन ट्रेन सुरू झालीय. देशभरातील राम भक्त यामुळे नक्कीच खुश झालेत. परंतु, नेहमी प्रमाणे ह्या गाडीला सावंतवाडी थांबा नाही. सावंतवाडीत रामभक्तांची कमी आहे का ? माझ्या देवाच्या, रामलल्लाच्या दर्शनाला येऊ नये म्हणून हा अट्टाहास आहे का असा सवाल रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी केला आहे.

अयोध्येला जाण्याची इच्छा सावंतवाडीकरांना देखील आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन व आमच्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन या रेल्वेला सावंतवाडीत थांबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.