रेल्वे तिकीटाचं काळा बाजार करणारा पोलिसांच्या जाळ्यात..!

कणकवली रेल्वे स्थानकात चौकशी सुरु
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 17, 2023 12:13 PM
views 3034  views

कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या सावंतवाडीतील एका तिकिट विक्रेत्यांच्या दुकानावर मडगाव रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास छापा टाकाला. याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या ऑफिस मधील साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले आहे.


सावंतवाडी रेल्वे स्थानकात याघटनेची नोंद करत संशियताला कणकवली रेल्वे स्थानकात आणले असून त्याठिकाणी त्याची कसून चौकशी  सुरु आहे. त्यामुळे रेल्वे तिकिट बुकींगचा काळाबाजार होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. आता अशा प्रकारे तिकीट बुकींग करणाऱ्या इतर सेंटरवरही आता कारवाई होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.