रेल्वे प्रवासी संघटनेची वेत्ये ग्रामपंचायतीत बैठक !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2024 16:55 PM
views 106  views

सावंतवाडी : वेत्ये गावात कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत वेत्ये यांच्यावतीने ग्रामस्थांची सावंतवाडी टर्मिनस, रेल्वे थांबे तसेच मागण्या पुर्ण न झाल्यास होऊ घातलेल्या २६ जानेवारीच्या आंदोलना संदर्भात चर्चात्मक बैठक झाली. यावेळी रखडलेल्या सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागला तरच पंचक्रोशी सह तालुक्याचा विकास होऊन येथील युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्रश्नाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या २६ जानेवारीला आंदोलन करू, या लढ्याला तुम्ही सर्वांनी साथ द्या असं आवाहन करण्यात आल.


रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक मंगळवारी वेत्ये येथे पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रश्नांसंदर्भात 26 जानेवारीला करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच शीतल खांबल, ग्रा.प सदस्य सुनील गावडे, स्नेहा मिठबावकर, महेश गावडे, जितेंद्र गावकर, गुरु गावकर, शेखर खांबल, शरद जाधव, शशि देऊलकर आदी उपस्थित होते.