
कुडाळ : राहुल गांधी हे सर्व सामान्य नागरिकांचे नेते आहेत,सर्वसामान्य नागरिकांना भेटणार भारतातील व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे विचार घेऊन गावातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांनी आज कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काँग्रेसचे नेते प्रकाश जैतापकर, समीर वंजारी, साक्षी वंजारी, पी सी अनावकर, विजय प्रभू, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस वाढवणे हे एकमेव ध्येय घेऊन मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रभारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात वाडी वाडीवर काँग्रेसचे विचार पोहोचावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान हवेत हे आमचे स्वप्न नाही, काँग्रेस हा सत्यतेवर चालणारा पक्ष आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वेगळे महत्त्व आहे इथला नागरिक समाधानी आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे असे काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांनी सांगितले.
काँग्रेस जिल्हाअध्यक्ष बाबत लवकरच निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सद्यस्थिती जरी जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी कार्यभार सुरू असला तरी सर्वांना सोबत घेत कोणत्याही अडीअडचणी शिवाय पक्षात समन्वय साधावे अशी सूचना दिली आहे. वरिष्ठांसोबत चर्चा झाल्यावर जिल्हाध्यक्षा बाबत निर्णय घेऊ असे काँग्रेस प्रभारी अजिंक्य देसाई यांनी सांगितले.