चितारआळी मित्रमंडळ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्‍पर्धेत राघवेंद्र चितारी संघ विजेता

Edited by:
Published on: March 19, 2024 05:30 AM
views 84  views

सावंतवाडी : चितारआळी मित्रमंडळाने आयोजित केलेल्‍या ‘चितारआळी प्रीमियर लीग २०२४’ भव्य प्रकाश झोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत राघवेंद्र चितारी संघाने गौरव दळवी यांच्‍या संघावर मात करत चितारआळी चषकावर आपले नाव कोरले. राघवेंद्र चितारी संघ या स्‍पर्धेतील विजेता ठरला. संपूर्ण स्‍पर्धेतील मालिकाविर म्‍हणून बाळा मडगावकर यांची निवड करण्‍यात आली. उत्‍कृष्‍ट फलंदाज म्‍हणून शुभम वर्दम, उत्‍कृष्‍ट गाेलंदाजाचा किताब संदीप पाटील यांना देण्‍यात आला. या सर्वांना चषक देवून गौरविण्‍यात आले. 

ही स्‍पर्धा शनिवारी (दि. १६ मार्च) चितार आळी येथे प्रकाशझोतात पार पडली. या प्रीमियर लीग स्‍पर्धेत सहा संघानी सहभाग घेतला होता. ही स्‍पर्धा साखळी पध्‍दतीने खेळविण्‍यात आली. या स्‍पर्धेची सुरुवात चितारआळी परिसरातील लहान गटातील मुलांच्‍या स्‍पर्धेने करण्‍यात आली. या स्‍पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २५०००/- व चषक, द्वितीय पारितोषिक १५०००/- व चषक तसेच वैयक्‍तीक बक्षिसे ठेवण्‍यात आली होती.

स्‍पर्धेतील विजेत्‍या संघाला चितार आळीतील ज्‍येष्‍ठ व्‍यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते देवराज सुराणा यांच्‍या हस्‍ते तसेच मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत राघवेंद्र चितारी यांच्‍या संघाला प्रथम पारितोषीक देवून गौरविण्‍यात आले. 

या प्रीमियर लीग स्‍पर्धेत सहा संघ मालकाच्‍या संघानी सहभाग घेतला होता. देवराज सुराणा, गौरव दळवी, राघवेंद्र चितारी, संतोष मडगांवकर, प्रथम मुद्राळे, राकेश नेवगी आणि योगेश सुराणा या संघ मालकांनी या स्‍पर्धेत सहभाग घेतला. देवराज सुराणा या संघात रोशन गोसावी, मेहुल काणेकर, दिनेश मुद्राळे, सचिन लठ्‍ठे, समीर लाड, निमेश वेर्णेकर,  ऋषभ मुद्राळे, राजेश लाड. गौरव दळवी यांच्‍या संघात महेश चितारी, दिलीप नारुरकर, कमलेश सुराणा, विनय काणेकर, भार्गव चितारी, राकेश चितारी, बाळा मडगांवकर, बच्‍चु मुद्राळे. राघवेंद्र चितारी यांच्‍या संघात शुभम वर्दम, धिरज भांबुरे, गणेश चितारी, राजन वर्दम, चिराग सुराणा, संदीप पाटील, जितेश वेर्णेकर, साहिल मडगावकर. संतोष मडगावकर यांच्‍या संघात  बिंटू गुप्‍ता, हेमंत गवस, ओमकार मुद्राळे, सुजन मुद्राळे, राहुल नेवगी, परेश  नारुरकर, मोससिन मुल्‍ला, पार्थ मुद्राळे. प्रथम मुद्राळे यांच्‍या संघात मयुरेश सावंत, गौतम खटावकर, नितीन गावडे, शेखर तेंडोलकर, ओमकार ढवळे, अमित पोतनीस, बाबू चितारी, सानिका मडगांवकर. राकेश नेवगी आणि याेगेश सुराणा यांच्‍या संघात चेतन चिंदरकर, पराग सुराणा, आदित्‍य सावंत, केतन सावंत,  अभि नारुरकर, मनोज हवालदार, प्रतिक चितारी, कल्‍पित नारुरकर. या स्‍पर्धेचे समालोचन नितेश गोवळकर यांनी केले तर पंच म्‍हणून गोट्या कारिवडेकर यांनी काम पाहिले.