
दोडामार्ग : दोडामार्ग शहरासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शहरवासीय व तालुक्यातून आणि परराज्यातून शहरात येणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना सतावणारा मोकाट गुरांच्या प्रश्नी त्यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील रस्त्यात, मुख्य राज्य मार्गावर मोकाट असलेल्या गुरांचे गळ्यात रेडियम रीपलेक्टर बेल्ट बांधण्याचा नवोपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविला जात आहे.
शहरातील समीर रेडकर व त्यांच्या सहकराई युवकानी या उपक्रमात सहभागी होत शहरात रात्री अपरात्री मोकाट फिरणाऱ्या जनावरांना आवर घालण्यासाठी विवेकानंद नाईक यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिलेले हे रेडियम बेल्ट मोकाट जनावरांच्या गळ्यात बांधण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. गुरवारी रात्री पासून दोडामार्ग शहरात ही मोहीम हाती घेण्यात आलीय. मोकाट जनावरे रात्रीच्या वेळी शहरातील सर्व रस्त्यावर मिळेल तिथे ठाण मांडून बसतात. अशावेळी बऱ्याचदा वाहनचालक बिथरून व त्यांच्या निदर्शनास न आल्यास अपघात होतात. अलीकडे तिलारी घाटातून सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्याने गोवा ते दोडामार्ग मार्गे बेळगाव, कोल्हापूर, हैद्राबाद वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अनोळखी आलेल्या वाहन चालकांना ही अनेकदा अपघातांना सामोर जावं लागल आहे. इतकचं नव्हे तर शहरात दैनिदिन फिरणाऱ्या शहर वासियांना ही तर हा त्रास रोजचाच झाला आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनचालकाना रात्रीची आवर घालण्यासाठी मध्यंतरी नगरपंचायत ने ही मोहीम हाती घेतली. मात्र ती तोकडी पडली. कोंडवाड्यात गुरे डांबूनही मालकांनी दाद न दिल्याने येथील परिस्थिती जैसे थे आहे. गुरांच्या मालकांना आवाहन करूनही सहकार्य करत नाहित. मात्र जनतेचे हाल होतात. शहरातील नागरिकांना त्रास होतो. यासाठी नेहमीच सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे उद्योजक यांनी समीर रेडकर व त्यांच्या टीमकडे यावर उपाययोजनांवर चर्चा केली. व आपण यासाठी स्वखर्चाने रेडियम बेल्ट उपलब्ध करून दिले. पहील्या टप्प्यात सुमारे 80 बेल्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यानंतर गुरवारी रात्रीपासून समीर रेडकर, सुमित म्हाडगुत, महेश मयेकर, स्वप्निल गवस, साजन गवस, विराज सावंत, सागर नाईक, रोहन खडपकर, विनायक खडपकर,शुभम मुळगावकर, निलेश पटकारे, लक्ष्मण खडपकर आदी युवकांनी मोकाट जनावरांच्या गळ्यात हे बेल्ट बांधण्याचं काम हाती घेतल आहे. मात्र मोकाट जनावरांना गळ्यात हे रेडियम बेल्ट बांधणे सहज शक्य नसल्याने काळजीपूर्वक ही मोहीम राबविली जात आहे. मोकाट असलेली ही जनावर सहज आपल्या नजदीक कुणाला फिरकू देत नाही त्यामुळे या टिमलाही आता मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. यासाठी नेहमीच गुरांच्या सोबत असणारा एखादा गुराखी शोधायचे काम समीर रेडकर व त्यांची टीम करत आहे. जेणेकरून उपद्रवी व जादा आक्रमक असलेल्या मोकाट गुरांनाही हे बेल्ट बांधण्यात येतील आणि त्याचा सर्वांनाच फायदा होईल. विवेकानंद नाईक यांनी मांडलेल्या या संकल्पनेच व सहकार्यचही समीर रेडकर यांची टीम आणि शहर वासियातूनही उस्फुर्त स्वागत होत आहे.
विवेकानंद नाईक यांचं कार्य सदोदित प्रेरणादायी : चेतन चव्हाण
ना राजकारणात ना कोणत्याही निवडणुकांत उतरणारे विवेकानंद नाईक यांचा समाजाप्रती असलेल्या दृष्टीकोन निश्चितच आजच्या युवाईला आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या तरुणाईला प्रेरणादायी आहे. केवळ आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो, आपल्याने जे होत आहे ते आपण निस्वार्थीपणे केलं पाहिजे. हे वेळोवेळी त्यांनी कृतीतून दाखवून दिलय. नाईक यांनी शहरासाठी यापूर्वीही असे अनेक उपक्रम राबविले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणीक, आरोग्य क्षेत्रातील कार्यात त्यांनी हातभार लावलेला आहे. आणि आता तर त्यांनी कल्पने पलीकडे जाऊन ही आगळी वेगळी मोहीम हाती घेतलीय. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे उद्गार नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केले आहेत.