
सिंधुदुर्ग : 'जिव्हाळा सेवाश्रम' येथे 'राधारंग फाऊंडेशन' या संस्थेने दिपावली सणाच्या निमित्ताने आश्रमास भेट देऊन एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या सदस्यांनी आश्रमातील लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच दिवाळीच्या फराळाचे वाटप केले.
यावेळी राधारंग फाऊंडेशनच्या सदस्यांनी आश्रमातील उपक्रम पाहून आपल्या भावना व्यक्त केल्या. 'जिव्हाळा सेवाश्रमा'चे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी चालविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच, आश्रमातील गोशाळेबद्दलही त्यांनी विशेष प्रेम व आदर व्यक्त केला. आश्रमाप्रती आपल्या भावना व्यक्त करताना सदस्यांचे खरोखरच मन भरून आले होते.
सदर कार्यक्रमास 'राधारंग फाऊंडेशन'च्या अरुणा रमाकांत सामंत, स्वाती रविंद्र वाजवलकर, प्रथमेश बळीराम नाईक, सौ. पूर्वा प्रथमेश नाईक, अमेय अभयकुमार देसाई, सचिन सामंत आणि संतोष सामंत हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी 'जिव्हाळा सेवाश्रमा'चे अध्यक्ष सुरेश बिर्जे, जयप्रकाश प्रभु, गितांजली बिर्जे, प्राजक्ता केळूसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सेवाश्रमाच्या अध्यक्ष महोदयांनी 'राधारंग फाऊंडेशन'च्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर गरजू व्यक्तींना मदत करून, त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.