कणकवलीत राडा ; एकमेकांवर कोयत्याने हल्ला

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 26, 2023 10:50 AM
views 1082  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव काटेवाडी येथील सत्यवान शंकर वारंग (६५) यांच्याकडे येत जात असलेला कामगार मंगेश राजाराम विणकर(४६, रा.वारगाव) यांच्यात झटापट होवून कोयत्याने एकमेकांवर हल्ला होवून गंभीर जखमा झाल्या आहे. ही झटापट होत असताना सोडवण्यासाठी सावित्री सत्यवान वारंग (६०) मध्ये आल्याने त्याच्याही डोळ्याला,हाताला दुखापत झाली आहे. मात्र,ही घटना कोणत्या कारणातून घडली?याबाबत पोलीस तपास करीत आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,सावडाव काटेवाडी येथील सत्यवान शंकर वारंग (६५) यांच्याकडे मंगेश विणकर हा कामासाठी आला होता.दुपारी अचानक श्री.विणकर हा कोयत्याने आपल्या डोक्यावर मारुन घेत असताना सत्यवान  वारंग काढून घेण्यासाठी पुढे गेला असता श्री.वारंग यांच्या पायाला कोयता लागला.त्यांनाही पायाला व हाताला दुखापत झाली.ही झटापट होत असताना श्री.वारंग यांची पत्नी सावित्री मध्ये आली तिलाही दुखापत डोळ्याला झाली आहे.या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर मंगेश राजाराम विणकर(४६, रा.वारगाव) यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पांडुरंग पांढरे,चंद्रकांत माने दाखल झाले असून या घटनेबाबत माहिती जखमीकडून घेतली जात आहे. ही घटना कोणत्या कारणातून  घडली? याचा तपास पोलीस तपासात उघड होईल.