
वैभववाडी : तालुक्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी शहरातील संभाजी चौकात जोरदार राडा केला.लोखंडी रॉडने एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली.यात तुषार निवृत्ती लिंगरे (वय-२१)हा गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी पोलीसांनी बारा विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार आज ता.१ तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
तुषार लिंगरे यांने दिलेल्या फिर्यादीत कृषी महाविद्यालयातील विजय नाळे रा.बारामती आणि रोहन पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता.हा वाद आपण मिटविला.त्यानंतर आज दुपारी भोजन करण्यासाठी मी आणि माझा मित्र वैभववाडीत आलो होतो.दुचाकीवरून जात असताना आपल्याला संभाजी चौकात बारा जणांनी अडविले.त्यातील अवधुत चव्हाण याने लोखंडी रॉड डोक्यात घातला.इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अशी तक्रार पोलीसांत दिली.या मारहाणीत विद्यार्थी लिंगरे हा गंभीर जखमी झाला.त्याला त्याच्या मित्राने तातडीने येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.त्यानतंर विद्यार्थी लिंगरे यांनी बारा जणाविरोधात मारहाणीची तक्रार केली.त्यानुसार पोलीसांनी रोहन पवार,आदीत्य जाधव,सुमित नारनवर,अवधुत चव्हाण,अविष्कार पाटील,निरजंन मोटे,शिवराज लाड,प्रांजल मोरे,पृथ्वीराज घाटगे,आदीत्य पाटील,विक्रम पाटील,सुयागे झाबरे,आणि राऊत या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.