
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे (वय ६९) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास दुःखद निधन झाले. रविवारी सायंकाळी ७.१५ सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
कणकवली नगर वाचनालयाचे व गोपुरी आश्रमाच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. कणकवलीच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा मोठा योगदान होते. कणकवली शहरातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पुढील वर्षाकरिता त्यांची नुकतीच नियुक्ती देखील करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यातही ते सक्रिय सहभागी असत. त्यांच्या या अचानक जाण्याने कणकवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे